व्यस्त शेड्यूलमधून आलिया भट्ट राहासोबत घालवते असा Quality Time

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चित्रपटामध्ये सतत व्यस्त असतात. अशावेळी आई आलिया लेक राहासाठी Quality Time काढते.

सध्या राहा आपल्या आई आलिया आणि बाबा रणबीर सोबत इटलीला गेली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगसाठी ते इटलीला गेले आहेत.

आलियाने राहासोबतचा एक क्यूट फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे. ज्यामध्ये आलिया राहाला मांडीवर घेऊन एक पुस्तक वाचून दाखवत आहे.

त्या पुस्तकाचं नाव आहे बेबी काइंड...आलिया राहाला लहानपणापासूनच दयाळूपणाची शिकवण देत आहे. जेणेकरुन ती प्रत्येकाला आदर देऊ शकते.

आलियाने टाकलेल्या फोटोमध्ये ते कुठेतरी फिरायला गेले आहेत असं दिसतंय. हा फोटो यॉटवर असून ते समुद्रात फेरफटका मारताना दिसत आहे.

बाबा रणबीर सध्या आगामी रामायण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अशात आलिया राहासोबत Quality Time व्यतित करत आहेत.

VIEW ALL

Read Next Story