ना नोकरी, ना छोकरी! ऑफिसमधल्या सहकाऱ्याला डेट करताना 'या' 8 चुका टाळा

डेटींग पॉलिसी तपासून घ्या

तुमच्याच कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीला डेट करण्याआधी कंपनीची काही डेटींग पॉलिसी म्हणजेच जोडीदारासंदर्भातील धोरणं आहेत का तपासून घ्या.

अडचणीत सापडणार नाही

कामाच्या ठिकाणी रिलेशनशीपसंदर्भातील कंपनीचे नियम आणि अटी तुम्हाला ठाऊक असतील तर भविष्यात तुम्ही अडचणीत सापडणार नाही. काही प्रसंगी अगदी नोकरीवरही गदा येते.

सार्वजनिक करु नका

तुम्ही दोघेही तुमच्या नात्यासंदर्भात ठाम नसाल तर ते सार्वजनिक करु नका. दोघांमधील नातं सुरुवातीला खासगीच ठेवा.

ही गल्लत टाळता येईल

कामाची वेळ वगळता तुम्ही एकमेकांशी काय बोलता, काय शेअर करता याला कामाच्या ठिकाणी फार महत्तव देऊ नका. कामाच्या ठिकाणी प्रोफेश्नल राहा. यामुळे खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात होणारी गल्लत टाळता येईल.

कसं वागायचं?

कामाच्या ठिकाणी एकमेकांबरोबर कसं वागायचं हे दोघांनी चर्चेतून ठरवून घ्या.

मतभेद तुम्ही कसे हाताळता यावर नातं अवलंबून

नोकरीला धक्का लावू न देता तुम्हा दोघांमधील मतभेद तुम्ही कसे हाताळता यावर या नात्याचं भविष्य अवलंबून असेल हे लक्षात घ्या.

प्रेमाचा दिखावा टाळा

सार्वजनिकपणे प्रेमाचा दिखावा टाळा. हात पकडणं, लपून छपून भेटणं यासारख्या गोष्टी ऑफिसमध्ये टाळाच. कामाच्या ठिकाणी प्रोफेशनल वागण्यास प्राधान्य द्या.

गोंधळ झालाच तर..

काही गोंधळ झालाच तर तुम्ही तो कसा हाताळणार याबद्दल आधीच चर्चा करुन ठेवा. उदाहरण म्हणजे तुमच्यासंदर्भात ऑफिसमध्ये कळलं किंवा एकाला प्रमोशन मिळालं दुसऱ्या नाही, असं काही घडल्यास काय करणार हे आधीच ठरवा.

स्वातंत्र्य जपा

प्रेमात असलात आणि एकाच ऑफिसमध्ये असलात तरी एकमेकांना स्पेस द्या. एकमेकांचं स्वातंत्र्य जपा. ऑफिसमधील आपआपल्या जबाबदाऱ्या योग्यपद्धतीने पार पाडा.

मानसिक आधार

एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्याने तुम्ही एकमेकांना अधिक छान पद्धतीने मानसिक आधार देऊ शकता हे लक्षात ठेवा. एकमेकांचा तणाव कमी होईल याची खबरदारी घ्या आणि ते वागण्यातून दाखवा.

VIEW ALL

Read Next Story