आलियाच्या साडीकडे सर्वांच्या नजरा, रामायणातील 'त्या' कथेची झलक

Saurabh Talekar
Jan 22,2024

प्राण प्रतिष्ठा सोहळा

अयोध्येतील नव्या राममंदिरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यासाठी अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

आलिया भट्ट

ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्टही पती रणबीर कपूरसोबत राम मंदिरात पोहोचली. मात्र, सर्वांच्या नजरा आलियाच्या साडी खिळल्या आहेत.

पारंपरिक लूक

या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलिया भट्टने अतिशय खास पारंपरिक लूक परिधान केला होता.

हिरवी साडी

हिरव्या रंगाच्या साडीमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. तिने साडीसोबत मॅचिंग शालही घातली होती.

खास डिझाइन

आलियाने परिधान केलेली साडी ही सामान्य साडी नाही. साडीवर एक खास डिझाइन आहे ज्यामध्ये रामायणाच्या कथेची झलक पहायला मिळत आहे.

अशोक वाटिका

आलियाच्या साडीच्या काठावर रामची कथा विणलेली आहे. यामध्ये अशोक वाटिकेत हनुमान माता सीतेला भेटल्याचं चित्र आहे. तर लंकेवरील हल्ल्याचं चित्र देखील दिसतंय.

विशेष तयारी

आलियाची साडी पाहता तिने राम मंदिराच्या सोहळ्यासाठी विशेष तयारी केल्याचं स्पष्ट होतंय. अभिनेत्रीने तिच्या लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

VIEW ALL

Read Next Story