अल्लू अर्जुन हा फक्त सुपरस्टारच नाही तर फॅमिली मॅनही आहे. त्याचं त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे, ज्याची झलक सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते.अल्लू अर्जुनने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीशी लग्न केलं, यानंतर या दोघांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलीचं नाव अरहा आणि मुलाचं नाव अयान आहे.

Oct 17,2023


अर्जुनला त्याच्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करतो, विशेषत: त्याची छोटी परी अरहा. अरहा तिच्या बाबांच्या खूप जवळ आहे.


अल्लू अरविंद हे अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील आहेत. ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहेत. अरविंद हे चित्रपट निर्माता आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.


अल्लू अर्जुनप्रमाणेच त्याचा भाऊ अल्लू शिरीष हा देखील साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक उत्कृष्ट अभिनेता आहे. 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'गौरवम' या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं. यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय.


अल्लू अर्जुनचे काका चिरंजीवी हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरहिट अभिनेते आहेत. चिरंजीवी यांचे लग्न अल्लू अर्जुनची मावशी सुरेखाशी झालं आहे. चिरंजीवी यांची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे.


अल्लू अर्जुनचे काका चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण हा देखील साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक उत्कृष्ट अभिनेता आहे. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. राम चरण यांनी काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.


पवन कल्याण हा साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी यांचा भाऊ असून तो स्वत: दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'अक्कादा अम्मयी इक्कादा अब्बाय' या चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. हा चित्रपट 1996 साली प्रदर्शित झाला होता.

VIEW ALL

Read Next Story