अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने आणखी एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे.
800 कोटींचा टप्पा पार करणारा 'पुष्पा 2' हा हिंदीतील पहिला चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने जगभरात 1799 कोटींची कमाई केली आहे.
'पुष्पा 2' तेलगू चित्रपट असला तरी त्याच्या हिंदी डब व्हर्जनने प्रचंड कमाई केली आहे.
या चित्रपटाने 31 दिवसांमध्ये 806 कोटींची कमाई केलीय. तर 'स्त्री 2' दुसऱ्या क्रमांकावर आहे.
शाहरुख खानचा जवान हा हिंदीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जगभरातील कमाईच्या बाबतीत हा चित्रपट केवळ दंगलच्या मागे आहे. दंगल चित्रपटाने जगभरात 2070.3 कोटींची कमाई केली होती.