अभिनेत्री अमला पॉल गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. 26 ऑक्टोबर रोजी त्यांच्या प्रपोजचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते जे अवघ्या काहीच वेळात व्हायरलही झाले होते. यानंतर आता या कपलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तमिळ, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमधून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री अमाला पॉल हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. तिने बॉयफ्रेंड जगत देसाईसोबत लग्नगाठ बांधली आहे, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघंही खूप सुंदर दिसत आहेत.

अमला पॉलच्या वाढदिवशी जगतने तिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. यानंतर त्यांची एंगेजमेंटही झाली. आणि आता लग्न झालं आहे.

लग्नाची थीम

अमला आणि जगत यांनी कोचीमध्ये लैव्हेंडर थीमवर लग्न केलं होतं.

अजय देवगणसोबत चित्रपट

अमला पॉलने अजय देवगणच्या 'भोला' चित्रपटातून पदार्पण केलं. यामध्ये ती अभिनेत्याच्या सोबत दिसली होती.

पहिलं लग्न आणि घटस्फोट

अमला पॉलने 2014 मध्ये एएल विजयसोबत पहिलं लग्न केलं. पण 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तो प्रोफेशनने दिग्दर्शक आहे.

कोण आहेत जगत देसाई?

जगत देसाई हा गुजरातचा रहिवासी आहे. तो एक बिझनसमेन आहे.

प्रेमात बुडालेलं दिसलं जोडपं

लग्नाच्या फोटोशूटमध्ये अमला आणि जगत एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसले.

VIEW ALL

Read Next Story