घाणेरडी वक्तव्यं अन् थेट हाणामारी... जेव्हा अमिताभ रेखासाठी फिल्मच्या सेटवरच भिडले

चर्चेतलं प्रेमप्रकरण

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कथित प्रेमप्रकरणाची मनोरंजनसृष्टीत चर्चा तर तुफान झाली.

जुना रंजक किस्सा

या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते असं सांगणारे आजही अनेकजण सापडतात. मात्र या दोघांचा एक जुना रंजक किस्सा चांगलाच चर्चेत आहे.

कधी घडला हा प्रकार?

अमिताभ आणि रेखा या दोघांसंदर्भातील हा प्रकार 'गंगा की सौगंध' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान घडला होता.

जयपूरमध्ये घडला हा प्रकार

1978 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील काही भागाचं चित्रिकरण जयपूरमध्ये झालं होतं.

उद्धट वर्तन

या चित्रपटाचं चित्रिकरण सुरु असताना 1977 साली जयपूरमध्ये एका व्यक्तीने रेखाबरोबर उद्धट वर्तन केलं होतं.

गर्दीत उभी होती ही व्यक्ती

'गंगा की सौगंध' चित्रपटाचं शुटींग पाहणाऱ्या चाहत्यांच्या गर्दीमध्ये रेखाबद्दल वाईट प्रतिक्रिया नोंदवणारी ही व्यक्ती उभी होती.

घाणेरडी विधानं

या व्यक्तीला रेखा दिसताच त्याने त्यांच्याबद्दल वाईट आणि घाणेरडी विधानं करण्यास सुरुवात केली.

मारहाण

या व्यक्तीला रेखाबद्दल वाटेल ते बोलताना ऐकून अमिताभ चिडले आणि त्यांनी या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

12 वर्षांचं अंतर

रेखा आणि अमिताभ या दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर असून पुढे या दोघांचे मार्ग वेगळे झाले. अमिताभ यांनी जया भादुरी यांच्याशी लग्न केलं.

एकत्र घेतलं जातं नाव

मात्र आजही अमिताभ आणि रेखा यांचं नाव अनेकदा एकत्र घेतलं जातं.

VIEW ALL

Read Next Story