आज शाहरूख खानचा 58 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं त्याच्या 'डंकी' चित्रपटाचा पहिला टीझर हा प्रदर्शित झाला आहे.

आज संपुर्ण दिवस शाहरूख खानचीच चर्चा राहिलेली आहे. शाहरूखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 साली झाला. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यानं अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांतूनही कामं केली होती.

आज शाहरूख खान हा अभिनयातला बादशहा आहे परंतु इथवर येण्यासाठी त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता त्याचाही संघर्ष हा सोप्पा नव्हता.

डंकी या चित्रपटातून शाहरूख खानसोबत विकी कौशल आणि तापसी पन्नूही दिसणार आहेत. हा चित्रपट राजकूमार हिरानी दिग्दर्शित आहे.

या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. आता येत्या 22 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

शाहरूख खानची लेक सुहाना खान हिचाही द आर्चिज हा डेब्यू चित्रपट येत्या 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. डंकीचा टीझर तुम्ही नीट पाहिलात का, यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्रीनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांची झलक पाहायला मिळाली आहे. परंतु त्यांच्या विनोदी शैलीतील अभिनयानं सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आहे.

VIEW ALL

Read Next Story