आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया अपारिज राहिली असून सलग सात विजय मिळवलेत. या विजयाबरोबरच टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.

Nov 02,2023


या संपूर्ण सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. पण यानंतरही एक गोष्ट क्रिकेट प्रेमींना सतावतेय.


टीम इंडियाचे फलंदाज शतकापासून हुकतायत. आतापर्यंतच्या सात सामन्यात 8 वेळा फलंदाज शतकापासून हुकलेत. आतापर्यंत केवळ 2 शतकं करता आलीत.


टीम इंडियाकडून विराट कोहली तीन वेळा शतकापासून दूर राहिला आहे. तर रोहित शर्मा दोन वेळा शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला आहे.


याशिवाय केएल राहुल, शुभमन गिल आणि श्रेय्यस अय्यर प्रत्येकी एकदा शतकाच्या जवळ पोहोचून बाद झालेत.


श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचे तीन फलंदाज शतकापासून दूर राहिले. यात विराट कोहली (88 धावा), शुभमन गिल (92 धावा) आणि श्रेयस अय्यरच्या (82 धावा) शतकापासून हुकले.


टीम इंडियाने श्रीलंकेविरोधात 358 धावांचा डोंगर उभा केला. पण एकाही फलंदाजाला शतक करता आलं नाही.

VIEW ALL

Read Next Story