अर्जुन-मलायकाच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आलेली कुशा आहे तरी कोण?

सध्या सोशल मीडियावर कुशा कपिलाची चांगलीच चर्चा आहे ती एका सेलिब्रेटी जोडप्याच्या कथित ब्रेकअपमुळे. चर्चेतील हा चेहरा कोण पाहूयात...

बोल्ड फोटो

अनेकदा कुशा तिच्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर करत असते. तिचे काही फोटो फारच बोल्ड असतात.

अर्जुन-मलायकाच्या ब्रेकअपमुळे ती चर्चेत

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा असून यामागील कारण सांगितलं जात आहे कुशा कपिला.

कुशाने नोंदवली पहिली प्रतिक्रिया

अर्थात कुशा कपिलाने यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना, "इतक्या मूर्ख गोष्टी वाचल्यानंतर मलाच स्वत:ची ओळख करुन घ्यावी लागते" असं म्हटलंय.

दोघांचं लिंकअप कसं?

अर्जुन आणि कुशा हे दोघे नुकतेच करण जोहरच्या घरी एका गेट-टूगेदरमध्ये स्पॉट झाले. यावेळेस मलायका नव्हती त्यावरुनच या दोघांचं लिंकअप केलं जात आहे.

कुशा कपिला आहे तरी कोण?

मात्र अर्जुन आणि मलायकाच्या कथित ब्रेकअपसाठी कारणीभूत असल्याचा दावा केली जाणारी कुशा कपिला आहे तरी कोण?

कंटेट रायटर

कुशा कपिलाने तिच्या करिअरची सुरुवात कंटेट रायटर म्हणून केली. ती आयडिव्हा वेबसाईटसाठी फॅशनसंदर्भातील लेख लिहायची.

दिल्लीतील काकी पात्र चांगलेच गाजले

याच कंपनीच्या फेसबुक पेजवरुन कुशाने साकारलेली दिल्लीमधील काकीचं पात्र चांगलेच गाजले आणि व्हायरल झाले.

नोकरी सोडली

कुशाने अचानक आपली नोकरी सोडली आणि ती पूर्णवेळ सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर म्हणून कायम करु लागली.

अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये दिसली

मागील काही महिन्यांमध्ये कुशा अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये समालोचन करताना दिसली.

ओटीटीवर अनेकदा दिसते

अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवरही कुशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहे.

काही आठवड्यांपूर्वीच मुंबईकर झाली

मूळची दिल्लीकर असलेल्या कुशाने काही आठवड्यांपूर्वीच मुंबईत घर घेतल्याचं सोशल मीडियावरुन सांगितलं होतं.

घटस्फोटाची घोषणा

काही आठवड्यांपूर्वीच कुशाने सोशल मीडियावरुन घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली.

लग्नानंतर 6 वर्षांनी घटस्फोट

लग्नाच्या सहा वर्षांनी कुशा कपिलचा घटस्फोट झाला आहे.

परस्पर संमतीने झाले वेगळे

पती जोरावर आलुवाहलियापासून कपिला वेगळी झाली असून परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

आता अर्जुनशी जोडलं जातंय नाव

आता कुशाचं नाव अर्जुन कपुरशी जोडलं जात असून तिने मात्र असल्या बातम्या आपल्या आईने वाचू नये अशी इच्छा व्यक्त केली आहे.

VIEW ALL

Read Next Story