साइकोलॉजिकल थ्रिलर मुव्ही, व्हिलन कोण अन् हिरो कोण? डोक्याचा भूगा होईल!

Published by: Saurabh Talekar | Jan 23, 2024

जगात माणुसकी शिल्लक आहे की नाही? असा सवाल तुम्हालाही अनेकदा पडला असेल. आपलास अशा काही घटना घडतात, ज्यामुळे आपल्या आयुष्यावर याचा थेट परिणाम होतो.

Published by: Saurabh Talekar | Jan 23, 2024

डोकं सुन्न करणारी मुव्ही

असाच एक डोकं सुन्न करणारी साइकोलॉजिकल थ्रिलर मुव्ही डिझ्नी प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे. जी पाहून तुम्हाच्याही डोक्याचा भूगा होईल.

Published by: Saurabh Talekar | Jan 23, 2024

दानवाची परीक्षा

कोणताही माणूस जिद्दीला पेटला की काय काय करू शकतो, याचं उदाहरण या सिनेमामध्ये दाखवण्यात आलं. माणसातील दानवाची परीक्षा घेणारा हा सिनेमा तुम्हालाही आवडेल.

Published by: Saurabh Talekar | Jan 23, 2024

माणसाचा लसावी - मसावी

पार्किंग असं या सिनेमाचं नाव आहे. नावाप्रमाणे पार्किंगच्या मुद्द्यावर हा सिनेमा आहे. आगळं वेगळं काही नाही. मात्र, माणसाचा लसावी (इग्नोर कण्याची क्षमता) आणि मसावी (सहन करण्याची क्षमता) याची फरक तुम्हाला पहायला मिळेल.

Published by: Saurabh Talekar | Jan 23, 2024

चुकीच्या गोष्टी

रागाच्या भरात माणूस किती चुकीच्या गोष्टी करतो. त्यामुळे आपण कोणत्या गोष्टी गमावू शकतो, याचा प्रत्तय तुम्हाला येईल. कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं जावं, याचा धडा देखील तुम्हाला मिळेल.

Published by: Saurabh Talekar | Jan 23, 2024

थोडं डोकं लावा

दोन्ही भाडेकऱ्यांमध्ये पार्किंगच्या मुद्द्यावरून झालेला राडा तुम्हाला नक्की काही ना काही शिकवून जाईल. तुम्हीही वेळ काढून सिनेमा नक्की पाहा अन् थोडं डोकं लावा.

Published by: Saurabh Talekar | Jan 23, 2024

VIEW ALL

Read Next Story