पौष पौर्णिमेला गुरु पुष्यासोबत 4 अद्भूत योग, 'या' राशींना आर्थिक लाभ

या वर्षातील पहिली पौर्णिमा ही गुरुवारी 25 जानेवारीला आहे. या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी अनेक अद्भूत योग जुळून आले आहेत.

या दिवशी गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग असणार आहे. त्याशिवाय अनेक ग्रहांचं मिलनही होणार आहे.

पौष पौर्णिमेला होणाऱ्या दुर्मिळ योगामुळे वृषभ, मिथुन, कन्या आणि तूळ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे.

वृषभ (Taurus Zodiac)

पौर्णिमेच्या दिवशी घडणाऱ्या दुर्मिळ योगायोगामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरु होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. नवीन गुंतवणुकीचे फायदेही मिळणार आहे. नोकरीत बढती मिळणार आहे.

मिथुन (Gemini Zodiac)

पौर्णिमा मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंदाची सुरुवात असणार आहे. आर्थिक लाभासह आयुष्यात सुख समृद्धी नांदणार आहे.

कन्या (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी पौर्णिमा उत्पन्नाचं नवीन मार्ग उडणार आहे. मित्रांकडून सहकार्य लाभणार आहे. कुटुंबासोबतही चांगला वेळ जाणार आहे.

तूळ (Libra Zodiac)

पौष पौर्णिमेला घडणारा दुर्मिळ संयोग तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. आर्थिक स्थितीही मजबूत होणार असून व्यवसायात प्रगती होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story