सौंदर्यामुळं सारंकाही...

'या' अभिनेत्रीसाठी सौंदर्यच ठरलं शाप; दिग्दर्शकांनी तोंडावर नाकारले चित्रपट

'रहना हे तेरे दिल मे'...

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दिया मिर्झा हिच्यासोबत काहीशा अनपेक्षित गोष्टी घडल्या. 'रहना हे तेरे दिल मे' या चित्रपटानं तिला रातोरात प्रसिद्धीझोतात आणलं.

जाणून आश्चर्य वाटेल...

पहिल्या चित्रपटानंतर मात्र दिया फार चित्रपटांमध्ये झळकली नाही. जाणून आश्चर्य वाटेल पण यासाठी तिचं सौंदर्य कारणीभूत ठरत होतं.

कुटुंबाचा कलाजगताशी संबंध नाही

दियाच्या कुटुंबाला कलाजगताचा पाया नव्हता. त्यामुळं तिनं शुन्यातून विश्व उभं केलं. एका मुलाखतीदरम्यानच तिनं आपल्याला सौंदर्यामुळं चित्रपट नाकारण्यात आल्याचं सांगितलं.

त्यांनी मला पसंतीच दिली नाही...

'आज असे कैक दिग्दर्शक आहेत ज्यांच्यासोबत मी काम करु इच्छित होते, पण त्यांनी मला पसंतीच दिली नाही', हे वास्तव तिनं सर्वांपुढे आणलं.

अनेक चित्रपटांचे प्रस्ताव

आजच्या घडीला ज्या दिग्दर्शकांनी आपल्याला नाकारलं त्यांनीच चित्रपटांचे प्रस्ताव आणले असं सांगताना तिनं बदललेली वेळ अधोरेखित केली.

कारकिर्दीतील यश

सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्वत:हून घराच्या स्वच्छतेपासून टेलिफोनच्या कलेक्शनपर्यंत सर्वकाही तिनं एकटीनंच केलं. आज कारकिर्दीतील यश पाहून आपल्याला मोठा दिलासा मिळतो असंही ती म्हणाली.

नशिबाचाही मोलाचा वाटा

पण आजच्या घडीला आपण जिथं आहोत ते पाहता यात नशिबाचाही मोलाचा वाटा होता हेसुद्धा दिया नाकारत नाही.

VIEW ALL

Read Next Story