बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजने नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक व्हिडीओ शेअर केला आहे.
तिच्या या नवीन पोस्टमुळे गर्भधारणेच्या अफवांना खतपाणी मिळाले आहे.
इलियानाच्या या पोस्टने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओ पाहून इलियान दुसऱ्यांदा आई होणार का? असा प्रश्न विचारत आहेत.
मात्र, अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे तिने 2024 चे काही खास क्षण शेअर केले आहेत.
या व्हिडीओमध्ये ऑक्टोबर 2024 मधील क्लिप, ज्यामध्ये इलियाना गर्भधारणा चाचणी किट दाखवताना दिसत आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर इलियाना दुसऱ्यांदा आई होणार असल्याची अफवा पसरली आहे.