'रंभा हो', 'हरी ओम हरी' आणि 'जब छाए तेरा जादू' सारखी सुपरहिट गाणी देणारी अभिनेत्री कल्पना अय्यर आता चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कल्पना अय्यर मोठ्या पडद्यापासून दूर आहे. कल्पना अय्यर 80 च्या दशकातील एक हिट आयटम गर्ल होती. 'हरी ओम हरी' गाण्यामुळे तिला ओळख मिळाली होती.
कल्पना 1978 मध्ये मिस इंडिया रनर-अप होती. यानंतर मिस वर्ल्ड 1978 मध्ये ती देशाच्या टॉप 15 स्पर्धकांमध्ये होती.
कल्पना अय्यरकडे ऑफर्सची रांग लागली होती. पण तिने काही मोजक्याच भूमिका निवडल्या होत्या. अभिनेत्रीसह ती एक गायिका आणि मॉडेल होती.
तब्बल 24 वर्षांपासून तिने अभिनयाला रामराम ठोकला आहे. ती सध्या दुबईत असून, तिला ओळखणंही कठीण आहे.
कल्पनाने ना लग्न केलं आहे, ना त्यांना मुलं आहेत. ती दुबईत एकटी राहते आणि एका निजाम रेस्तराँची मॅनेजर आहे.
कल्पनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, माझं कामच माझा पीआर आहे. पण तिने योग्य नेटवर्किग केलं नाही. इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर ते महत्त्वाचं असतं.
"चित्रपटांमध्ये आता माझं वास्तव्य नाही असंच फिल्म इंडस्ट्रीने समजून घेतलं होतं. मला चित्रपट मिळणं बंद झालं. तेव्हा मला मालिकांमध्ये काम करावं लागलं. पण त्याचा काही फायदा झाला नाही"
कल्पनाच्या कुटुंबातही अनेक समस्या होत्या. पैशांची गरज, त्यात सिंगर पॅरेंट असणाऱ्या बहिणीची जबाबदारी यामुळे ती पुन्हा एकदा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत आली आणि दुबईला गेली.
कल्पनाचं नाव अमजद खान यांच्याशी जोडलं गेलं होतं. पण ते शेवटपर्यंत पोहोचू शकलं नाही. माझ्या नशिबात लग्न होतं आणि विना लग्नाचं मूल जन्माला घालणं मला शक्य नव्हतं असं कल्पनाने सांगितलं.