बालकलाकार म्हणून श्रीदेवीने तेलुगू चित्रपटामधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
'मा नन्ना निर्दोषी' हा तिचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट तिने 4 वर्षांची असताना केला होता.
बॉलिवूडमध्ये श्रीदेवीचा पहिला चित्रपट हा 1972 मध्ये 'रानी मेरा नाम' प्रदर्शित झाला होता.
नायिका म्हणून श्रीदेवीचा बॉलिवूडमधील 'सोलहवां सावन' हा तिचा पहिला चित्रपट होता.
अभिनेत्रीला सर्वात जास्त प्रसिद्धी ही जितेंद्र यांच्यासोबतच्या 'हिम्मतवाला' या चित्रपटातून मिळाली होती.
या चित्रपटानंतर श्रीदेवी ही निर्मात्यांची पहिली पसंत होती. 1989 मध्ये तिचा 'चांदनी' चित्रपट प्रदर्शित झाला होता.