हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. थंडीच्या दिवसात आहारात काही भाज्यांचा समावेश करणं टाळायला हवं, त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
काकडी ही शरीराला थंड ठेवण्याचं काम करते. हिवाळ्यात काकडीचे सेवन केल्यास सर्दी, खोकला अशा समस्या होऊ शकतात.
दुधी देखील नैसर्गिकपणे थंड भाजी आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात दुधीचे सेवन केल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
हिवाळ्यात कोथिंबिरीचा वापर जेवणात कमी प्रमाणात करावा. अन्यथा सर्दी, खोकला सारखे आजार होऊ शकतात.
हिवाळ्यात कोबीचे सेवन केल्याने पचनसंस्था कमकुवत होऊन पोटात गॅससारख्या समस्या निर्माण होतात.
मटार खाल्ल्याने हिवाळ्यात पोटात गॅस आणि ऍसिडिटी होऊ शकते, त्यामुळे थंडीत खाणे टाळावे.
शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन C चे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो जे सर्दी, खोकल्याचे कारण ठरते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)