स्वरा भास्करला कास्टिंग काऊचचा अनुभव

बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच आता एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. प्रत्येक नवख्या अभिनेता, अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. स्वरा भास्करही या अनुभवातून गेली आहे.

दिग्दर्शकाने मागितलं लैंगिक सुख

एका मुलाखतीत तिने कशाप्रकारे एका दिग्दर्शकाने कामाच्या बदल्यात आपल्याकडे लैंगिक सुख मागितलं होतं याचा खुलासा केला होता.

दिग्दर्शकाचा दारुच्या नशेत रुममध्ये प्रवेश

स्वराने दिलेल्या माहितीनुसार, एका दिग्दर्शकाने दारुच्या नशेत तिच्या रुममध्ये प्रवेश केला होता. त्याला मला मिठीत घ्यायचं होतं. भूमिकेसाठी त्याने माझ्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली.

स्वराचा नकार

स्वराने मात्र दिग्दर्शकाची मागणी मान्य करण्यास नकार दिला होता. यामुळे तिच्या हातून अनेक चित्रपट निसटले होते.

संपूर्ण दिवसभर पाठलाग

स्वराने सांगितलं होतं की, जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होती तेव्हा मला मेसेज आणि डिनरचं निमंत्रण पाठवत छळण्यात आलं होतं. संपूर्ण दिवसभर तो माझा पाठलाग करायचा आणि रात्री फोन करायचा.

हॉटेलच्या रुममध्ये मद्यपान करत बसला होता

एका सीनवर चर्चा करण्यासाठी मला त्याच्या हॉटेलच्या रुममध्ये जाण्यास सांगितलं होतं. मी गेली तेव्हा तो मद्यपान करत होता.

लव्ह, सेक्स आणि वन नाइटबद्दल चर्चा

पहिल्याच रात्री त्याने लव्ह, सेक्स आणि वन नाइटबद्दल बोलण्यास सुरुवात केली. तो दारुच्या नशेत माझ्या खोलीत आला आणि मिठी मारण्यास सांगू लागला.

घाबरल्याने बाहेरच पडत नव्हती स्वरा

मी घाबरली होती. मी एकटी आणि तरुण होती. पॅकअपनंतर मी लाइट बंद करायचे, मेकअप काढून टाकायची जेणेकरुन मी झोपली आहे असं इतरांना वाटेल असं स्वराने सांगितलं आहे.

सेटवर सुरक्षारक्षक

दिग्दर्शकाच्या या सवयींना कंटाळून स्वराने एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसरकडे तक्रार केली होती. आपल्याला सेटवर सुरक्षारक्षक मिळावेत याची खात्री स्वराने करुन घेतली.

VIEW ALL

Read Next Story