त्वचा, केस आणि दात यांच्याशी संबंधित अनेक समस्यांपासून तेलाच्या मदतीनं आराम मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया खोबरेल तेल काही फायदे.
डार्क सर्कल्स घालवण्यासाठी खोबरेल तेल आणि कॉफी वापरा. एका भांड्यात एक चमचा खोबरेल तेल घ्या. त्यात एक चतुर्थांश चमचा कॉफी घाला. हे मिश्रण हातात घेत हळू हळू डोळ्याभोवती 2 मिनिटे मसाज करा आणि नंतर रात्रभर राहू द्या. त्यानंतर ते धुवून काढा.
ओठांच्या एक्सफोलिएशनसाठी खोबरेल तेल वापरा. एका भांड्यात 1 चमचा साखर आणि 1 चमचा खोबरेल तेल एकत्र करा. हे दोन्ही मिक्स करून काही वेळ ओठांना स्क्रब करा. यानं डेड स्किन निघून जाईल.
लांब आणि दाट केसांसाठी खोबरेल तेल वापरा. एका भांड्यात 1 चमचा खोबरेल तेल घ्या. त्यात 4 चमचे कांद्याचा रस घाला. हे दोन्ही मिक्स करून काही वेळ टाळूला मसाज करा. थोड्यावेळा केस धुवून काठा. यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होईल.
टाचांना भेगा पडण्यासाठी खोबरेल तेल वापरा. एक चमचा खोबरेल तेलात एक चमचा व्हॅसलीन मिसळा. झोपण्यापूर्वी टाचांवर हे मिश्रण लावा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी उठून नीट स्वच्छ धुवून घ्या.
रोज रात्री झोपताना चेहऱ्याला थोडं खोबरेल तेल लावा. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यानं धुवा तुमची त्वचा तजेलदार होईल.
नारळाच्या तेलात अॅन्टी एजिंग प्रॉपर्टी असतात. त्यासोबतच पुरळपासून सुटका देखील मिळते.
जर तुम्हाला देखील आहे बेली फॅटची समस्या मग तुमच्या जेवणात नक्कीच करा नारळाच्या तेलाचा समावेश
नारळाच्या तेलानं हाडांची मजबूती देखील वाढते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)