मनोरंजन सृष्टीमध्ये पुरस्कारांनाही विशेष महत्त्व असतं. बॉलिवूडमध्येही अनेक पुस्कार सोहळे होतात आणि त्यांची चर्चाही होते.
अनेकदा एखाद्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळतात. मात्र सर्वाधिक पुरस्कार मिळालेला हिंदी चित्रपट कोणता असं तुम्हाला विचारलं नक्कीच तुम्ही गोंधळात पडाल.
सन 2000 साली प्रदर्शित झालेल्या या हिंदी चित्रपटाने बॉलिवूडला एक नवा स्टार तर दिलाच पण त्याबरोबर विक्रमही प्रस्थापित केला.
या चित्रपटाला 1-2 नाही तर तब्बल 92 पुस्कार मिळाले आहेत. हा चित्रपट शाहरुख खान किंवा अक्षय कुमार किंवा सलमान खानचा नाही.
हा चित्रपट आहे राकेश रोशन यांचा पुत्र ऋतिक रोशनचा. हा ऋतिकचा पहिला चित्रपट होता.
14 जानेवारी 2000 ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव आहे, 'कहो ना प्यार है'! या चित्रपटाने तिकीटबारीवर दमदार कामगिरी केली.
या सुपरहीट चित्रपटाने तब्बल 92 पुरस्कार पटकावले. या चित्रपटाची नोंद थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनेही घेतली.
2002 साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची नोंद गिनीज बुकमध्ये केली.
सन 2003 मध्ये लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा चित्रपट म्हणून 'कहो ना प्यार है' नोंद करण्यात आली.
'कहो ना प्यार है' चित्रपटासाठी राकेश रोशन यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ऋतिकने या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
ऋतिकला 'कहो ना प्यार है' चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेता आणि सर्वोत्तम पदार्पणाचे पुरस्कार मिळाले.
'कहो ना प्यार है'चं बजेट 10 कोटींचं होतं. या चित्रपटाने 78.83 कोटींची कमाई केली.