दही खालून कोशिंबीर किंवा रायता मोठ्या आवडीने खाल्ले जाते. दही आणि सलाड या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
दह्याची कोशिंबीर करताना त्यात कांदादेखील टाकला जातो. पण दह्यासोबत कांदा खावा का? असे अनेक प्रश्न आहेत. कांदा आणि दही एकत्र खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याचा सविस्तर आढावा
कोशिंबीरीमध्ये कांदा घालून खाणे, आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते, असं काही आरोग्यविषयक तज्ज्ञ सांगतात.
दही आणि कांदा हे विरुद्ध अन्न मानले जाते. दही हे थंड असते तर कांदा गरम असतो. त्यामुळं दोन्ही पदार्थ एकत्र खाणे आयोग्य मानले जाते.
दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरात वात, पित्त आणि कफ या दोषांचे असंतुलन निर्माण होते. ज्यामुळं गंभीर परिणाम होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते, दही कांदा एकत्र खाल्ल्याने अपचन, आम्लपित्त, सूज येणे आणि पोटच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात.
शरिरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते. त्यामुळं अॅलर्जी, पुरळ, एक्जिमा, सोरायसिससारखा त्रास निर्माण होऊ शकतो
दही-कांदा विरुद्ध अन्न असल्याने विषबाधा होऊ शकते. यामुळं मळमळ, उलट्या, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते.
जर तुम्हाला दह्यात कांदा घालायचा असेल तर त्याची वेगळी पद्धत आहे. कांदा तळून मग त्यात दही मिसळा त्यामुळं त्याचा प्रभाव कमी होतो.
कांदा तळल्यानंतर त्यातील सल्फरची पातळी कमी होते. त्यामुळं कमी प्रमाणात तुम्ही दह्यात कांद्याचा वापर करु शकता.