अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा पहिला प्री वेडिंग सोहळा जामनगरमध्ये तर दुसरा प्री वेडिंग सोहळा इटलीत पार पडला. यात विविध क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले होते.

या सोहळ्यात मुकेश अंबानी यांची होणारी सून राधिक मर्चंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राधिकाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या सोहळ्यातील राधिका मर्चंटच्या गाऊनची चांगलीच चर्चा रंगली आहे. या सोहळ्यासाठी राधिकाने खास हा गाऊन बनवून घेतला होता.

ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा असलेला हा गाऊन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय डिझायनर रॉबर्ट वुनने तयार केला होता. या गाऊनवर काही अक्षरं छापण्यात आली होती.

पण ही काही साधीसुधं अक्षर नव्हती. तर अनंत अंबानीने राधिकाला मर्चंटला लिहिलेली लव्ह लेटर या गाऊनवर छापण्यात आली होती.

राधिका मर्चंटच्या 22 वाढदिवसानिमित्ताने अनंत अंबानीने राधिकासाठी लव्ह लेटर लिहिली होती. ती आऊटफिटवर प्रिंट करण्यात आली.

अनंत अंबनीने आपल्या हाताने लिहिलेली ही लव्ह लेटर आऊटफिटवर प्रिंट कर राधिकाने ती आपल्या आयुष्यात किती खास आहेत हे दाखवून दिलं.

VIEW ALL

Read Next Story