Big Boss फेम कपल Breakup च्या वाटेवर! 3 वर्षांपासून मालाडमध्ये Live-In मध्ये राहत होते पण..

Swapnil Ghangale
Dec 13,2023

नातं संपुष्टात येण्याची चर्चा

छोट्या पडद्याच्या विश्वामधून एक वाईट बातमी समोर येत आहे. एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांचं नातं संपुष्टात येण्याची चर्चा आहे.

ब्रेकअपच्या दिशेने

एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांच्या नात्याची वाटचाल ब्रेकअपच्या दिशेने सुरु असल्याचं वृत्त 'टाइम्स नाऊ'ने दिलं आहे.

नातेसंबंधांमध्ये तणाव

सध्या एजाज खान आणि पवित्रा पुनिया एकत्र राहत असले तरी नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव कसा कमी करता येईल यासंदर्भात त्यांचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते.

3 वर्षांपासून एकत्र राहतात

एजाज खान आणि पवित्रा पुनिया मागील 3 वर्षांपासून मुंबईतील मालाडमध्ये एकत्र राहतात. दोघेही अजून वेगळे झालेले नाहीत मात्र त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडलाय हे निश्चित.

वाद मिटवण्याचा प्रयत्न

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजाज खान आणि पवित्रा पुनिया त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामध्येही दोघांचे बरेच मतभेद आहेत.

गोंधळावर कोणतीही प्रतिक्रिया नाही

एजाज खान आणि पवित्रा पुनियाने नात्यातील या गोंधळावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नसली तरी दोघांचे प्रयत्न नातं पूर्वव्रत करण्याचे आहेत.

रिलेशनचं बिग बॉस कनेक्शन

बिग बॉस 14 मध्ये एजाज आणि पवित्राची जोडी तयार झाली होती. कार्यक्रमात एकमेकांशी भांडताना ते प्रेमात पडले होते. कार्यक्रमातून बाहेर पडल्यावर त्यांनी नात्याची औपचारिक घोषणा केलेली.

एकत्र लिव्ह-इनमध्ये

एजाज आणि पवित्रा दोघे फार आनंदाने एकत्र लिव्ह-इनमध्ये राहत होते. त्यांचा लग्नाचाही विचार होता. संपूर्ण कुटुंब लग्नाला यावं अशी एजाजची इच्छा आहे.

मतभेद वाढले

पवित्रालाही वयाने 11 वर्षांनी मोठा असलेल्या एजाजबरोबरच्या नात्याला नवं नाव देण्याची इच्छा होती. मात्र अचानक या दोघांमध्ये मतभेद वाढले असून याचा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

वाद मिटावा अशी चाहत्यांची इच्छा

एजाज आणि पवित्रामधील हा वाद लवकरच संपावा आणि त्यांनी लग्नबंधनात अडकावे अशी चाहत्यांची इच्छा आहे. आता या दोघांचं पुढे काय होणार याचं उत्तर काळच देईल.

VIEW ALL

Read Next Story