कोट्यवधींची संपत्ती आणि घरंदाजपणा...

सेलिब्रिटी विश्वामध्ये अनेकदा काही कुटुंबांची सातत्यानं चर्चा होते. त्याच गर्दीतलं एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांच्या कुटुंबाचं. कलाजगतात मोलाचं योगदान देणाऱ्या या कुटुंबातील प्रत्येकाविषयी चाहत्यांच्या मनात आपुलकी आहे.

Dec 19,2023

कुटुंबाला चाहत्यांचं प्रेम

चिरंजीवी असो, त्यांचा मुलगा रामचरण असो किंवा मग सून उपासना असो. या कुटुंबाला कायमच सर्वांचं प्रेम मिळालं.

नावलौकिक

चिरंजीवी यांचा मुलगा कलाविश्वात नावलौकिक मिळवत असतानाच त्यांची सून म्हणजेच उपासमा काम्मिनेनी उद्योग जगतात पाय घट्ट रोवून उभी आहे.

उपासनाचं कुटुंब

उपासना आणि राम चरण यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. प्रसिद्ध कार्डीओलॉजिस्ट प्रताप सी रेड्डी यांची ही नात. रेड्डी हे अपोलो रुग्णालय समुहांचे संस्थापक असून, त्यांची कोट्यवधींची संपत्ती डोळे दीपवणारी आहे.

उपासना काम्मिनेनी

राम चरणची पत्नी, अर्थात उपासना काम्मिनेनी अपोलो रुग्णालय समुहात Vice Chairperson पदावर काम करते.

मॅनेजिंग डायरेक्टर

'बी पॉझिटीव्ह' नावाच्या एका मासिकाची ती संपादिकासुद्धा आहे. याशिवाय ती TPA मध्ये मॅनेजिंग डायरेक्टरपदी काम पाहते.

एकूण संपत्ती

राहिला प्रश्न एकूण संपत्तीचा, तर उपलब्ध आकडेवारीनुसार उपासनाची एकूण संपत्ती आहे 1100 कोटी रुपये.

VIEW ALL

Read Next Story