कमाईच्या बाबतीत दीपिकाच 'क्वीन' रणबीर मात्र गरिब

'बॉलिवूडची मस्तानी' म्हणजेच दीपिका पदुकोण आपल्या अभिनयामुळेच नाही तर फॅशनमुळेही चर्चेत असते.

दीपिका फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये आणि टोलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केरत आहे.

आज दीपिकाचा 38 वा वाढदिवस असून आज आपण तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया.

दीपिका अनेक आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँड्सची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. अभिनेत्रीची एकूण संपत्ती 500 कोटी आहे.

फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही अभिनेत्रीची जोरदार चर्चा होत असते. दीपिका एका चित्रपटासाठी 15 ते 16 कोटी इतकं मानधन घेते.

दीपिकाचं वार्षिक उत्पन्न 40 ते 50 कोटींच्या आसपास आहे. त्यासोबतच अभिनेत्री एका इंस्टाग्राम पोस्ट साठी जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपये इतके मानधन आकारते

दीपिकाकडे अनेक लक्झरियस आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.

रणवीरची एकूण संपत्ती 245 कोटी रुपये इतकी आहे. दीपिका रणवीरलाही संपत्तीच्या बाबतीत मागे टाकत असल्याचं दिसतय.

दीपिका आणि रणवीरने नोव्हेंबर 2018 मध्ये इटलीमध्ये लग्नगाठ बांधली.

VIEW ALL

Read Next Story