'सुभेदार' चित्रपटाची चर्चा

सध्या चर्चा आहे ती म्हणजे दिग्पाल लांजेकर यांच्या 'सुभेदार' या चित्रपटाची. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

चाहत्यांच्या नजरा वळल्या

सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाच्या पोस्टरनं चाहत्यांच्या नजरा वळवल्या आहेत.

चित्रपटाचे पोस्टर जारी

@subhedarthefilm या इन्टाग्राम पेजवरून या चित्रपटाचे पोस्टर जारी करण्यात आले आहे.

पोस्टच्या कॅप्शनची चर्चा

''रनांगनात आमी न्हाई लढत.. परत्येक मावळ्याच्या आईचं, बहिणीचं, अस्तुरीचं, असं धीराचं बोलंच लढत असत्यात…'' असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

ही आहे स्टारकास्ट

चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, शिवानी रंगोले, उमा सरदेशमुख, अभिजीत श्वेतचंद्रा, अर्नव पेंढारकर अशी स्टारकास्ट या चित्रपटातून दिसणार आहे.

पाचवे पुष्प

श्रीशिवराजअष्टकातील हे पाचवे पुष्प आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

मालुसरे कुटुंबियांची पहिली झलक

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. मालुसरे कुटुंबियांची पहिली झलक या चित्रपटातून समोर आली आहे. (All Photos: @subhedarthefilm | Instagram)

VIEW ALL

Read Next Story