श्रावण महिन्यात ही रोपं अंगणात लावणे अत्यंत पवित्र मानले जाते
हे झाड कोणत्याही दिवशी लावू शकता. उद्यानात किंवा रस्त्याच्या कडेला लागवड करा. पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी देऊन प्रदक्षिणा केल्याने घरामध्ये रोग राहत नाहीत.
शमी वनस्पती घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला ठेवणे शुभ असते. यामुळे शनिदेवाचा त्रास कमी होतो आणि आरोग्य चांगले राहते.
घरासमोर डाळिंबाचे रोप लावणे चांगले. घरात डाळिंबाचे रोप लावल्याने घरातील वातावरण सुधारते. नकारात्मक ऊर्जा संपते.
केळीचे झाड श्रावणाच्या एकादशीला किंवा गुरुवारी लावता येते. केळीचे रोप घराच्या मागील बाजूस लावावे.केळीच्या रोपाला नियमित पाणी दिल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
श्रावण महिन्यात किंवा कार्तिक महिन्यात लावल्यास उत्तम. सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खावी.