केबल टी.व्ही.च्या काळात घरोघरी चालणारे हे 8 मराठी चित्रपट लक्षात आहेत का?

तंत्रज्ञानाची साधने कमी असताना असे काही मराठी चित्रपट होते जे पोट धरुन हसायला लावायचे. हे चित्रपट चित्रपटगृहात कमी चालले असले तरी महाराष्ट्राच्या घराघरातून खुप चालले. हे चित्रपट जर विसरला असाल तर पून्हा नक्की बघा.

अशी ही बनवाबनवी

अशोक सराफ, लक्ष्मिकांत बेर्डे , सचिन पिळगावकर , नयनतारा अश्या दिग्गज् कलाकारांनी गाजवलेला हा चित्रपट दुरदर्शनवर खुप चालायचा. 1988 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे संवाद आजही लोकांना तोंडपाठ आहेत.

गाढवाचं लग्न

मकरंद अनासपुरेंनी या चित्रपटात केलेले काम मराठी प्रेक्षकांना फारच आवडले होते. चित्रपटाची कथा जरा हटके आहे . मकरंद अनासपुरेंचे चित्रपटातातील विनोद फार लोकप्रिय झाले.

जत्रा

भरत जाधव , विजय चव्हाण, सिध्दार्थ जाधव, प्रिया बेर्डे आदी. कलाकार या चित्रपटात आहेत . चित्रपटातील गाणी फारच गाजली. एवढी गाजली की बॉलिवूडने चित्रपटातील 2 गाण्यांचे संगीत हिंदी गाण्यांसाठी वापरले.

पछाडलेला

भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, श्रेयस तळपदे ,वंदना गुप्ते, लक्ष्मिकांत बेर्डे,विजय चव्हाण यांसारख्या कलाकारांनी चित्रपटात प्रसिद्ध केला. चित्रपटाची रुपरेखा विनोदी-थरारक अशी आहे.

अग बाई अरेच्चा

असं म्हणतात बायकांच्या मनात काय चालतं ते सांगू शकत नाही पण मग ते एका पुरुषाला ऐकू आलं तर? अश्या वेगळ्याच कथानकावर आधारित या चित्रपटात संजय नारवेकरांचे काम बघण्याजोगे आहे. चित्रपट एवढा गाजला की त्याचा 2रा भाग सुद्धा प्रकाशित झाला.

पक पक पकाक

अंदाजे 2005 ते पुढे 2016 पर्यंत हा चित्रपट सतत दूरदर्शनवर दिसायचा चित्रपटातला लहान मुलगा खऱ्या आयुष्यात मोठा झाला तरीही चाहते चित्रपट विसरले नाहीत नाना पाटेकरांचे संवाद निसर्ग-जीवन याविषयांचा विचार करायाला लावणारे आहेत .

दे धक्का

हा चित्रपट आपल्या परिवारासोबत बसून बघण्यासारखा आहे. मकरंद अनासपुरे ,शिवाजी साटम, सिध्दार्थ जाधव,सक्षम कुलकर्णी , मेधा मांजरेकर इ. कलाकार चित्रपटात आहेत. परिवार आपल्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे विनोदी कथानकातुन सांगणारा हा चित्रपट आहे.

नवरा माझा नवसाचा

खूपच जास्त रसिकप्रेम या चित्रपटाने मिळवले . सचिन-अशोक ही जोडी या चित्रपटात फारच गाजली. चित्रपटाने चांगली गाणी मराठी चित्रपटसृष्टीला दिली.

VIEW ALL

Read Next Story