अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर विवाह बंधनात अडकले. मुंबईतल्या ताज एंडसमध्ये दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं.

नूपुर शिखरेचा मॅरेज सर्टिफिकेटवर सही करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लग्नात नूपुरने चक्क जिम वेअर परिधान केला होता. त्याच कपडयांमध्ये त्याने मॅरेज सर्टिफिकेटवर सही केली.

लग्नात आयरा खानचा लूकही साधा होता. हिरव्या रंगाचा सूट तीने परिधान केला होता. या लग्नाला आमिरची दुसरी पत्नी किरण रावही उपस्थित होती.

लग्नासाठी नूपुर घोडीवरुन नाही तर 8 किलोमीटर धावत लग्न मंडपात पोहोचला. नूपुर कपडे बदलेल असं उपस्थित लोकांना वाटत होतं.

लग्नात अमिर खानने गुलाबी रंगाचा फेटा बांधला होता. तर रिना दत्ताने पंजाबी सूट परिधान केला होता.

आयरा आणि नूपुर तीन वर्ष एकमेकांना डेट करत होते. 8 जानेवारील राजस्थानमध्ये ग्रँड रिसेप्शन पार पडणार आहे.

VIEW ALL

Read Next Story