ग्राहकांनो, सोने खरेदीची करा लगबग! जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

सोन्याच्या किमतीत घसरण

तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अजिबात उशीर करू नका, कारण आज (4 जानेवारी 2024) सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली.

दरवाढीचे सत्र कायम

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सोने 700 रुपयांनी वधारले होते. नवीन वर्षातही दरवाढीचे सत्र कायम होते.

सोन्याचा भाव

गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीच्या किंमती उसळल्या

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चांदी 1100 रुपयांनी महागली. नवीन वर्षांत चांदीच्या किंमती उसळल्या.

एक किलो चांदीचा भाव

गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,600 रुपये आहे. एका वर्षात चांदीने तगडा रिटर्न दिला आहे. चांदीने एका किलोमागे ग्राहकांना 7200 रुपयांची कमाई करुन दिली.

14 ते 24 कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 63,013 रुपये, 23 कॅरेट 62,761 रुपये, 22 कॅरेट सोने 57,720 रुपये झाले.

एक किलो चांदीचा भाव

तर 18 कॅरेट 47,260 रुपये, 14 कॅरेट सोने 36,863 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,691रुपये झाला.

VIEW ALL

Read Next Story