बॉलिवूडचा अण्णा उर्फ सुनिल शेट्टी याची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टीचं नुकतंच क्रिकेटर केएल राहुलबरोबर लग्न झालं. पण लग्नात सर्वाधिक चर्चा झाली ती सुनिल शेट्टीच्या लूकची. वयाच्या 61 वर्षीदेखील त्याचा फिटनेस पाहून चाहते थक्क झाले होते.
बॉलिवूडचा वादग्रस्त अभिनेता म्हणजे संजय दत्त. अभिनयाबरोबरच तो अनेक कारणाने चर्चेत असतो. एका प्रकरणात तो काही तुरुंगातही होता. पण वयाच्या 63 व्या वर्षीही संजूबाबाची क्रेझ चाहत्यांच्या मनावर कायम आहे. संजय दत्त दोन मुलांचा पिता असून फिटनेच्या बाबतीत तो खूप सजग असतो.
60 वर्षांपेक्षा जास्त बॉलिवूड अभिनेत्यांच्या फिटनेसमध्ये पहिला क्रमांत लागतो तो अनिल कपूरचा. अनेक सुपरहिट चित्रपट दिलेल्या अनिल कपूरचा लूक आणि फिटनेस आजही तसाच टिकून आहे.
53 वर्षांच्या अजय देवगनने हिंदी चित्रपटसृष्टीत एक अॅक्शन हिरो म्हणून नाव कमावलं आहे. फिटनेस आणि लूकमुळे तो तरुण वर्गात आजही आकर्षणाचा विषय असतो.
फिटनेस आणि सिक्स पॅक अॅप पाहून सलमान खानच्या वयाचा अंदाज लावणं तसंच कठिणच आहे. तरुणांना लाजवेल अशी सलमानची बॉडी आहे. आजही तो अनेक तास जिममध्ये व्यायाम करतो. वयाच्या 57 व्या वर्षीदेखील सलमान फिट आहे.
बॉलिवूडमधला सर्वात यशस्वी अभिनेता म्हणजे शाहरुख खान. वयाच्या 57 वर्षी देखील बॉलिवूडचा किंग खान असल्याचं त्याने सिद्ध केलं आहे. त्याच्या पठाण चित्रपटाने संपूर्ण जगात 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. यावरुनच त्याची किती क्रेझ आहे हे सिद्ध होतं.
बॉलिवूडमधला मिस्टार खिलाडी अर्थात अक्षय कुमार 55 वर्षांचा आहे. पण आजही तो आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. अक्षयला कोणतंही व्यसन नाही. आजही सकाळी चार वाजता उठून तो व्यायाम करतो. इतकंच काय तर डाएट आणि वेळेवर झोपण्याचे नियम तो कधी चुकवत नाही. त्यामुळेच या वयातही तरुण मुलांना लाजवेल असा त्याचाा फिटनेस आहे.
बॉलिवूडमधला सर्वात हँडसम अभिनेता अशी ओळख असलेल्या ऋतिक रोशन 49 वर्षांचा आहे. तो दोन मुलांचा पिता आहे आणि आता तो गर्लफ्रेंड सबा आझमीबरोबर दुसरं लग्न करण्याच्या तयारीत आहे. या वयातही ऋतिक अनेक मुलींचा आयकॉन आहे.
शाहरुख खानच्या पठाणने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले. वयाच्या पन्नाशीत आपण बॉलिवूडचा किंग असल्याचं शाहरु खानने दाखवून दिलं आहे. पण केवळ किंग खानच नाही तर सलमान खान, अमिर खान, ऋतिक रोशन, अक्षय कुमार इतकंच तर संजय दत्त, सुनील शेट्टी आणि अनिल कपूर या सर्वांनी वयाची पन्नाश गाठली आहे. पण बॉलिवुडवर त्यांचा दबदबा आजही कायम आहे.