हेल्थी आणि निकचं फेव्हरेट स्नॅक्स

प्रियंका चोप्राचा हा पॉपकॉर्न ब्रँड सध्या वॉलमार्ट आणि एलबर्टसन्स कंपनीच्या स्टोर्समध्ये उपलब्ध आहेत. प्रियंकाने हे पॉपकॉर्न हेल्थी असल्याचं म्हटलं आहे. आणि विशेष म्हणजे निकचे पण ते फेव्हरेट आहेत.

मुंबई नाईट्स पॉपकॉर्न

भारतीय क्वचितच इतके महाग पॉपकॉर्न खरेदी करतील. पॉपकॉर्न हा प्रियंकाचा फेव्हरेट स्नॅक आहे. मुंबई नाईट्स असं या पॉपकॉर्न ब्रँडला नाव देण्यात आलं आहे. रॉब्स वैंकस्टेज पॉपकॉर्न हा ब्रँड तयार केला आहे.

पॉपकॉर्नची किंमत बजेटबाहेर

पॉपकॉर्नचं एक पॅकेट 113 ग्रॅम वजनाचं असणार आहे, आणि एका पाकिटाची किंमत 494 रुपये इतकी आहे. अमेरिकेत ही किंमत कमी आहे. पण भारतीय रुपयांचा विचार केला तर सामान्यांच्या बजेटबाहेर आहे.

पॉपकॉर्न ब्रँड बाजारात

प्रियंकाने इंडियन स्पाइसेस मिक्स्ड पॉपकॉर्न लाँच केले आहेत. तीन फ्लेव्हर्समध्ये हे पॉपकॉर्न ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. पती निक जोनासच्या साथीने तीन फ्लेवर्स निश्चित करण्यात आले आहेत.

प्रियंका विकणार पॉपकॉर्न

सर्वात आधी प्रियंकाने आपल्या ब्रँडचा शॅम्पू लॉन्च केला. त्यानंतर क्रॉकरी आणि मग कॉस्मेटिक सामान बाजारात आणला. आता प्रियंकाने पॉपकॉर्नचा ब्रँड आणला आहे.

प्रियंकाची यशस्वी वाटचाल

बॉलिवूड अभिनेत्री अभिनयाच्या क्षेत्राबरोबरच बिझनेस क्षेत्रातही यशस्वी वाटचाल करतेय. या क्षेत्रातही प्रियंकाने आपल्या नावाच दबदबा निर्माण केला आहे.

VIEW ALL

Read Next Story