अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका घेऊन नीता अंबानी काशी विश्वनाथ मंदिरात गेल्या होत्या. त्यांनी लग्नपत्रिका देवाच्या चरणी ठेवत आशिर्वाद घेतले.

देवाच्या चरणी लग्नपत्रिका ठेवल्यानंतर आता स्वत: अनंत अंबानी लग्नपत्रिकाचं वाटप करण्यासाठी बाहेर पडला आहे. बॉलिवूडमध्ये लग्नाची पहिली पत्रिका अजय देवगणला देण्यात आली.

अलिशान लाल कारमधून अनंत अंबानी अजय देवगणच्या घरी जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोल्स राईसमधून अनंत अंबानी अजय देवगणच्या घरी गेला होता.

अजय देवगण आणि काजोलच्या शिवशक्ती बंगल्या बाहेरचा हा व्हिडिओ आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत अनंत अंबानी बंगल्यातून बाहेर येताना दिसतोय.

अनं अंबानी आणि राधिका मर्चंट यांची बॉलिवूड सेलिब्रेटींशी पक्की दोस्ती आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यातही अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सहभागी झाले होते.

अनंत आणि राधिकाचं पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये पार पडला होता. तर दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीत एका अलिशान क्रुजवर संपन्न झाला होता.

आता अनंत आणि राधिकाचं लग्न 12 जुलैला होणार आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कनवेंशन सेंटरमध्ये तीन दिवस हा सोहळा रंगणार आहे. 12 जुलैला लग्न, 13 जुलैल आशिर्वाद समारोह आणि 14 जुलैला ग्रँड रिसेप्शन पार पडणार आहे.

VIEW ALL

Read Next Story