शुभ कार्याला कधीच... मृत्यूशय्येवर असताना रावणाने लक्ष्मणाला दिलेले यशस्वी आयुष्याचे 3 सल्ले

सितेच्या अपहरणाची शिक्षा मिळाली

रावणाने सीता मातेचं अपहरण करुन जे कृत्य केलं त्याची शिक्षा त्याला मिळाली.

रावणाचा वध

भगवान श्री रामाने रावणाचा अहंकार मोडून काढला आणि त्याचा वध केला.

मोठा ज्ञानी पंडित

श्री रामानेच रावणाचा वध केला असला तरी रावण हा एक मोठा ज्ञानी पंडित होता.

अहंकारामुळे संपला

मात्र अहंकारामुळे त्याला धर्म आणि अधर्मातील फरक समजला नाही आणि तो अहंकाराच्या आहारी गेला. तिथूनच त्याच्या अंताला सुरुवात झाली.

लक्ष्मणाला सांगितल्या 3 गोष्टी

धर्मशास्रानुसार रावणाने मृत्यूपूर्वी लक्ष्मणाला तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या.

आयुष्याची गुरुकिल्ली ठरतील अशा 3 गोष्टी

मृत्यूशय्येवर असताना रावणाने लक्ष्मणाला अशा तीन गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या यशस्वी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली ठरु शकतात, असं सांगितलं जातं.

पहिला सल्ला

रावणाने सांगितलेली पहिली गोष्ट म्हणजे, शुभ कार्यासाठी फार काळ थांबू नये.

शुभ कार्यासंदर्भातील सल्ला काय?

जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर शुभ कार्य उरकून घ्यावे, असा पहिला सल्ला रावणाने दिल्याचं सांगितलं जातं.

दुसरा सल्ला

रावणाने दिलेला दुसरा सल्ला हा शत्रूसंदर्भात होता. कधीच आपल्या शत्रूला तुच्छ समजू नये, असं रावणाने सांगितलं होतं.

ही चूक कधीच करु नये

आपल्या शत्रूला फार हलक्यात घेण्याची चूक कधीच करु नये, असं रावण म्हणालेला.

कुुटुंबाबद्दल तिसरा सल्ला

रावणाने दिलेला तिसरा सल्ला हा कुटुंबातील सदस्यासंदर्भात होता.

शेवटचा सल्ला...

आपल्या आयुष्यातील काही अती महत्त्वाची गुपितं आपल्या भावालाही सांगू नयेत असा रावणाचा तिसरा सल्ला होता.

धार्मिक आणि सामाजिक मान्यतांवर आधारित

डिस्क्लेमर - येथे देण्यात आलेली सर्व माहिती धार्मिक आणि सामाजिक मान्यतांवर आधारित आहे. zee24tass.com याला दुजोरा देत नाही.

VIEW ALL

Read Next Story