बांगलादेशच्या सुपरहॉट अभिनेत्री, बॉलिवूडलाही देतात टक्कर

बांगलादेशच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव नुसरत फारिया आहे. नुसरत अभिनेत्री, मॉडेल, गायिका, टीव्ही प्रेजेंटर आणि रेडिओ जॉकीसु्द्धा आहे. तिच्या सौर्यांमुळे ती बांगलादेशमध्ये लाखो तरुणांची क्रश आहे.

अभिनेत्री नुसरत फारिया हिने बंगबंधु यांची बायोपिक मुजीब : दे मेकिंग ऑफ नेशमध्ये शेख हसीना यांची भूमिका साकारली होती.

नुसरत फारियाने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. बादशाह द डॉन या चित्रपटात तीने काम केलं आहे. याशिवाय ढाका 2040, Bhoy, वेडिंग बेल्स, रॉकस्टार, फुटबॉल, Pordar Arale या चित्रपटात दिसणार आहे.

अभिनेत्री पोरी मोनीसुद्धा बांगलादेशमध्यो लोकप्रिय आहे. पोरी मोनी हिचे Rokto, Mohua Sundori हे चित्रपट बांगलादेशध्ये सुपरहिट ठरले होते. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ती प्रसिद्ध आहे.

अभिनेत्री रफियश रशीद मिथिला ही अभिनयाबरोबर गायिकासुद्धा आहे. मिथिला हिचे चित्रपट बांगलादेशबरोबर कोलकाताही पाहिले जातात. 2006 मध्ये तीन चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

अभिनेत्री बिद्या सिन्हा सहा मीमने 2008 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तीने ब्यूटी पिजेंट Lux Channel I Superstar 2007 चं जेतेपदही पटकावलं आहे.

अभिनेत्री सादिया जहान प्रोवा ही व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. सादियाने 2010 मध्ये अभिनेता Ziaul Faruq शी विवाह केला. पण हे लग्न एक वर्षच टिकलं.

VIEW ALL

Read Next Story