1 किलो वजन घटवण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो?

वजन

शेकड्यानं आहारतज्ज्ञ, जाणकार आणि त्यांनी दिलेल्या असंख्य डाएट प्लॅनची गर्दी सध्या आजुबाजूला पाहायला मिळते. यामुळं वजन कमीसुद्धा होतं. पण, ते कमी झालेलं वजन नियंत्रणात ठेवणंच खरं कसब असतं.

वजन नियंत्रित ठेवणं

कमी झालेलं वजन नियंत्रित ठेवत त्यात फारसा फरक पडू न देणं यासाठी एका चांगल्या जीवनशैलीचीच आवश्यकता असते. यामध्ये व्यायाम, झोप आणि आहार मुख्य भूमिका बजावतात.

आहाराच्या सवयी

जाणकारांच्या मते आहाराच्या सवयी आणि चांगल्या जीवनशैलीनंतर जर एखाद्या व्यक्तीचं वजन दर आठवड्याला 1 ते 2 पाऊंड इतक्या फरकानं कमी होत असेल (0.5 ते 1 किलो) तर ही सकारात्मक बाब आहे.

कॅलरी

आठवड्याला एक किलो वजन कमी करण्यासाठी शरीराला दर दिवशी किमान 400 ते 500 कॅलरींची गरज असते. शिवाय तितक्याच कॅलरी बर्न करणं गरजेचं असतं.

फळं, भाज्या आणि अन्नधान्य

कमी कॅलरींचं सेवन करणं म्हणजे, अधिक फळं, भाज्या आणि अन्नधान्यांचं सेवन. या आहारामुळं पोट भरलेलं राहतं आणि शरीलाला अनावश्यक कॅलरींचा पुरवठा केला जात नाही.

स्निग्ध घटक

ब्रेड आणि रिफाईंड पदार्थांना वगळून आरोग्यदायी पदार्थांचं सेवन, आहारात नैसर्गित स्निग्ध घटकांचा अर्थात तूप, ऑलिव्ह ऑईल, अॅवकाडो ऑईल, नट बटर अशा गोष्टींचा वापर करून चवीनं आणि संतुलित आहार खाऊन वजन कमीही करता येतं आणि नियंत्रणातही ठेवता येतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story