बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई-बाबा होणार आहेत. दोघंही आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यास उत्सुक आहेत.

May 07,2024


पण त्याआधीच रणवीर सिंगने एक धक्कादायक पाऊल उचललंय. रणवीरने दीपिकाबरोबरचे लग्नाचे सर्व फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन डिलीट केले आहेत.


इन्स्टाग्रामवर रणवीर सिंहच्या प्रोफाईलवर आता केवळ 133 पोस्ट आहेत. जानेवारी 2023 च्या आधीचे सर्व फोटोज आणि व्हिडिओज त्याने काढून टाकलेत.


रणवीरच्या प्रोफाईलवर शेवटची पोस्ट एका जाहीरातीची आहे. त्यानंतरच्या पोस्ट रणवीरने का डिलीट केल्या हे गुलदस्त्या आहे.


रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचं 14 नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न झालं. इटलीत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता.


दाक्षिणात्य आणि सिंधी पारंपरिक पद्धतीने रणवीर आणि दीपिकाचं लग्न झालं. या लग्नात काही मोजकीच लोकं सहभागी झाली होती.


सप्टेंबर 2024 मध्ये दीपीका पादुकोण आई होणार आहे. बाळाच्या स्वागतासाठी दोघंही उत्सुक आहेत.

VIEW ALL

Read Next Story