हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना दुसऱ्यांदा गरोदार आहे. यादरम्यान तीने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रिहानाने शेअर केलेल्या फोटोत ती आपल्या मुलाला ब्रेस्ट फिडिंग करताना दिसत आहे. या फोटोवरुन सोशल मीडियावर सध्या वाद पेटला आहे.

रिहानाने आपला पहिला मुलाग Rza ला कुशीत घेतलं आहे आणि ती त्याल ब्रेस्टफिडिंग करत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वास्तविक रिहानाने आपला ब्रँड 'फेंटी एक्स'साठी मॅटर्निटी ब्राची नवी मालिका सादर केली आहे. यासाठी तीने स्वत:च मॉडेलिंगही केलं आहे.

रिहानाने हे फोटो वर्ल्ड ब्रेस्टफिडिंग वीक 2023 दरम्यान शेअर केले होते. या फोटोंवर फॅन्सने अनेक कमेंट दिल्या आहेत. काही फॅन्सने यावर नाराजी व्यक्त केली आहे.

रिहानाच्या चाहत्यांनी मात्र तिच्या या धाडसाचं कौतुक केलं आहे. असे फोटो पोस्ट करण्याची ही रिहानाची पहिलीच वेळ नाहीए.

रिहानाने शेअर केलेल्या फोटोत तीने आपल्या बेबी बंपही फ्लॉन्ट केला आहे. रिहाना आणि तिचा बॉयफ्रेंड Asap Rockye यांचं हे दुसरं अपत्य असेल.

32 वर्षीय रिहानाने घरगुती हिंसात, एलजीबीटीक्यू, डोनाल्ड ट्रम्प आणि भारतातील शेतकरी आंदोलनावरही रिहानाने ट्विट केल होतं. रिहानाचा पहिला म्यूझिक अल्बम 2005 मध्ये आला होता.

VIEW ALL

Read Next Story