ठाण्यात आज पाणीकपात! 'या' भागांना बसणार फटका
ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पाणीकपात करण्यात येणार आहे.
उल्हास नदीवरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अशुद्ध पाणी पंपिंग स्टेशनच्या काम हाती घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातून 50 टक्के कमी प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
रुपादेवी पाडा, किसननगर नं.2, नेहरूनगर, तसेच मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव पाणी पुरवठा कमी असणार आहे.
दिवा, मुंब्रा, प्रभाग क्र. 26 आणि 31 चा काही भाग वगळून कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये पाणी कपात असणार आहे.
पंपिग स्टेशनमध्ये अडकलेला कचरा काढण्याचे काम सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे.
पाणी कपातीमुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन ठाणे महापालिकेने दिले आहेत.