बॉलिवूडच्या स्टार किड्मध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे ती अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान. कधी जाहीरात, कधी पार्टी तर कधी क्रिकेट स्टेडिअममधली हजेरी यामुळे ती सतत लाईमलाईटमध्ये असते.

वयाच्या अवघ्या 24 वर्षात सुहाना खान प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. इतकंच काय तर या वयात ती करोडो रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

'द आर्चीज' या चित्रपटाच्या माध्यमातून सुहाना खानने हिंदी चित्रपटसृ्ष्टीत पाऊल ठेवलं. या चित्रपटात सुहानाच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं.

या चित्रपटानंतर सुनहा खानकडे अनेक जाहारातींच्या ब्रँडची रांग लागली. चित्रपट आणि जाहीरातीच्या माध्यमातून सुहाना कोट्यवधी रुपये कमावतेय.

सुहान खान सध्या मेबिलिन या ब्यूटी प्रोडक्ट्स आणि लक्स ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. विशेष म्हणजे सुहानाचे वडील म्हणजे शाहरुख खानही लक्सचे ब्रँड अॅम्बेसेडर होते.

सुहाना खानने काही महिन्यांपूर्वीच अलीबाग इथं एक जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत जवळपास 10 कोटी रुपये इतकी आहे. मीडिया रिपोर्टनुसार तीचं न्यूयॉर्कलाही एक घर आहे.

सूहान खानकडे रेंज रोवर आणि लॅम्बोर्गिनी या महागड्या कार आहेत. सुहाना खानकडे तब्बल 13 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सुहाना खान सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर तिचे 5.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. यातूनही सुहानाची चांगली कमाई होते.

VIEW ALL

Read Next Story