काही चित्रपट हे कलाकारांमुळं तर काही चित्रपट हे कथानकामुळं चर्चेचा विषय ठरतात.
'गँग्स ऑफ वासेपूर' हा त्यातीलच एक चित्रपट. याच चित्रपटात अभिनेता रवी किशनही झळकणार होता.
एका विचित्र अफवेमुळं मात्र त्याला या चित्रपटासाठी निवडण्यात आलं नव्हतं.
कोणीतरी आपण दुधानं अंघोळ करतो आणि गुलाबाच्या पाकळ्यांवर झोपतो असं सांगितलेलं... असा खुलासा रवी किशन यांनी एका मुलाखतीत केला.
अनुराग कश्यपपर्यंत ही चर्चा पोहोचली आणि त्यांनी निर्णय बदलला.
माझ्याकडे त्याच्या मागण्यांसाठीचे पैसे नाहीत, असं म्हणत चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि रवी किशन या चित्रपटाला मुकला.