बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आपचे नेते राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पडला असून लवकरच दोघंही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

परिणीती आणि राघव चड्ढा यांना अनेकवेळा एकत्र पाहिलं गेलं.पण दोघांकडून रिलेशनवर कोणंतही भाष्य करण्यत आलं नव्हतं. पण 13 मे रोजी साखरपुडा करत दोघांनीही चाहत्यांना धक्का दिला.

नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे अमृतसरच्या गुरुद्वारात दर्शनासाठी गेले होते. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी उज्जैन इथल्या मंदिराला भेट दिली. लग्नाच्या अगोदर बाबा महाकालचे आर्शिवाद घेण्यासाठी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा पोहचले.

कपाळावर चंदन आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घालत बाबा महाकालची पूजा आणि आरती करून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी आर्शिवाद घेतले.

परिणीती आणि राघव यांनी हातात आरतीची थाळी घेऊन महाकालची पूजा केली याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बाबा महाकालच्या दर्शनासाठी पारंपारिक वेशभूषा बंधनकारक आहे. या नियमाचं पालन करत परिणीताने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. तर राघव चड्ढा यांनी धोतर आणि उपरणं परिधान केलं होतं.

मे महिन्यात परिणीती आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा कपूरथाला हाऊसमध्ये मोठ्या धुमधडाक्यात पार पडला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं लग्न 25 सप्टेंबरला होणार आहे. राजस्थानमध्ये शाही थाटात हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं बोललं जात आहे.

VIEW ALL

Read Next Story