लसूण सोलायला कंटाळा येतो? या सोप्या टिप्स वापरून बघाच

भाजी किंवा डाळीला लसणाची फोडणी दिल्यास छान चव येते. मात्र लसूण सोलणे हा मोठा टास्क असतो.


लसूण सोलायच्या सोप्या टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या पद्धतीने लसूण सोलल्यास अगदी मिनिटात लसूण सोलून होईल.


सगळ्यात पहिले एका छोट्या वाटीत पाणी घ्या. यात लसणाच्या पाकळ्या भिजत ठेवा. त्यानंतर 1 तासानंतर पाण्यातून लसूण बाहेर काढा.


पाण्यातून लसूण बाहेर काढल्यानंतर आता त्यावर थोडासा दाब दिल्याण आपोआप सालं वेगळी होतील. त्यानंतर एअर टाइट डब्यात लसूण भरुन ठेवून फ्रीजमध्ये ठेवा.


लसूण सोलत असताना हाच चिकट होत असतील तर हातांना आधी तेल लावा.


लसणाच्या वरचा हिस्सा कापून सोलल्यास लगेचच सालं मोकळी होतात आणि वेळही कमी लागतो.


एक डब्बा घ्या त्यात लसूण टाकून झाकण घट्ट बंद करा त्यानंतर जोरजोरात हा डब्बा हलवा. यामुळं लसणाची सालं मोकळी होतील आणि लवकर लसूण सोलून होईल.

VIEW ALL

Read Next Story