परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचं लग्न याच वर्षीच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. लग्न सोहळा साखरपुडा सोहळ्यापेक्षाही शाही असणार आहे.
परिणीती चोप्राचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 मध्ये हरियाणातल्या अंबालामध्ये झाला. परिणीतीचे वडिल पवन चोप्रा उद्योगपती आहेत तर आई हाऊसवाईफ आहे. परिणीतिचे दोनही भाऊ हॉटेल व्यावसायिक आहेत.
राघव चड्ढा हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पक्षाचे ते प्रमुख प्रवक्ते देखील आहेत. राघव यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1988 ला दिल्लीत झाला. राघव चड्ढा यांनी चार्टर्ड अकाऊंटचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
खासदार राघव चड्ढा हे राजकारणाशी संबंधीत असल्याने काही राजकीय नेतेमंडळीही उपस्थित राहणार आहेत. यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश आहे.
परिणीतिची बहिण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा पती निक जोनस आणि मुलगी मालतीमेरीसह या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. याशिवाय परिणीतिचा खास मित्र करण जोहरची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.
13 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता साखरपुड्याचा सोहळा सुरु होईल. सोहळ्याची सुरुवात अध्यात्मिक अध्यात्मिक पद्धतीने होणार असल्याची सूत्रांच माहिती आहे. त्यानंतर रात्री शाही जेवणाचा बेत आहे.
परिणीति चोप्रा साखरपुड्यासाठी प्रसिद्ध ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला आऊटफिट परिधान करणार आहे. तर राघव चड्ढा डिझायनरल पवन सचदेवने डिझाईन केलेला कपडे परिधान करणार आहेत.