छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. ऋतिक रोशन, टायगर श्रॉफसारख्या दिग्गजांना तो टक्कर देतो.

गुरमीत चौधरीने आपल्या फिटनेसचं सिक्रेट सांगितलं आहे. सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने याबाबत माहिती दिलीय.

गुरमीतने इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत आपण गेली 14 वर्ष समोसा खाल्ला नसल्याचं सांगितलं. मला समोसा आवडत असला तरी मी त्याचा त्याग केल्याचं त्याने म्हटलंय.

आपला फिटनेस राखण्यासाठी अशा प्रकारचं डेडिकेशन गरजेचं असल्याचं त्याने सांगितलं. तळलेले आणि बाहेरचे पदार्थ खाण्यापासून दूर राहा असा सल्ला त्याने दिलाय.

जवळपास प्रत्येक दिवशी माझं शुटिंग सुरु असतं, पण यातही माझं वर्कआऊट आणि आहार विसरत नाही असंही गुरमीत याने म्हटलं आहे.

गुरमीत चौधरीने टीव्हीवरील रामायण मालिकेत रामाची तर गीत हुई सबसे पराई या मालिकेत मान सिंह खुरानाची भूमिका साकारली आहे.

गुरमीत चौधरी आपल्या फिटनेस आणि डाएटसंबंधातील फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. गुरमीत झलक दिखलाजा 5 चा विजेताही आहे.

VIEW ALL

Read Next Story