प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेपासून म्हातारपणापर्यंत खूप सारे मित्र येतात.
पण या साऱ्यामध्ये खरा मित्र कसा ओळखायचा? हे खूप कठीण असतं.
वाईट काळात तुमच्या सोबत असेल तो तुमचा खरा मित्र असतो.
खरा मित्र कधी दिखावा करत नाही आणि घमेंडही दाखवत नाही.
खरा मित्र तुम्हाला वाईट गोष्टी करण्यापासून रोखतो.
खरा मित्र तुमच्यापासून किती दूर का असेना पण मैत्री पक्की असते.
खरा मित्र तुमच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळात सोबत असतो.
खरा मित्र कधीच कोणत्या गोष्टीला नाही बोलत नाही. वेळप्रसंगी पैशाचीही मदत करतो.