शाहरुखच्या काही दिवसांपूर्वी आलेल्या 'जवान' सिनेमानं तिकीट खिडकीवरची मरगळ दूर केली. पण बॉक्स ऑफिस वर हीट ठरलेला शाहरुख याला राष्ट्रीय पुरस्कार मात्र मिळाला नाहीये.
बॉलिवुडची हरहुन्नरी अभिनेत्री दीपिकाला अद्याप एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही.
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिरची ओळख आहे. पण त्यालाही अजून राष्ट्रीय पुरस्कार काही मिळालेला नाही. त्याला पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कारांचा आमिर मानकरी असला तरीही अभिनयसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार काही आमिरला मिळालेला नाही.
राणीलाही अजून राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाहीये.
आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली असली तरीही राष्ट्रीय पुरस्काराची मात्र अनुपम यांना प्रतीक्षा आहे.
रणबीरचा चाहतावर्ग जरी मोठा असला तरीही त्याला अजून एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही.
अक्षयला अजून पर्यंत एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही.
हॅंडसम हंक हृतिकलाही आतापर्यंत एकदाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही.
सिनेमांमध्ये काजोलचा अभिनय नेहमीच उत्कृष्ट असतो पण तिलाही अजून एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही.
मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्याला अजून एकदाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाहीये.
बमन यांचा अभिनय जरी उत्तम असला तरीही राष्ट्रीय पुरस्कार मात्र त्यांना मिळालेला नाही.
नवाजच्या अभिनयाची सर्व स्तरांतून कौतुक होत असते. पण असे असले तरीही त्याला राष्ट्रीय पुरस्कार मात्र मिळालेला नाही.
आपल्या उत्साहवर्धक अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणारा अभिनेता रणवीर सिंहलाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही.