गौतमीचा कोणताही कार्यक्रम असला तरी तिच्या कार्यक्रमात नक्कीच काही तरी गोंधळ होतो. अशात तिथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागतो.
गौतमीचे सोशल मीडियावर लाखो चाहते असून इन्स्टाग्रामवर 848K फॉलोवर्स आहेत.
गौतमीचं आडनाव पाटील नसल्याचे म्हटले जात आहे. नक्की तिचं आडनाव काय हे कोणाला ठावूक नसल्यानं ती आतापर्यंत पाटील लावत असल्याचे म्हटले जाते.
गौतमीच्या आडनावावरून पुण्यात एक बैठक घेतली असून त्या बैठकीत तिच्या नावावरून वाद झाला आहे.
गौतमीचं आडनाव पाटील नाही तर चाबुकस्वार असं असल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे.
गौतमीचं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. त्यामुळे पाटील आडनाव तिनं लावू नये. तर पाटील हे आडनाव लावत ती पाटलांची बदनामी करत आहे, असे आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे.
मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी घेतलेल्या या बैठकीत निर्णय घेतला आहे की गौतमीनं तिचं खरं आडनाव लावलं नाही तर राज्यात तिचा कार्यक्रम होऊ देणार नाही.
आज म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी गौतमीचा संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील विरार परिसरात कार्यक्रम आहे.
गौतमी आज तिच्या कार्यक्रमा दरम्यान, पत्रकारांना मुलाखत देत तिच्या आडनावावरून झालेल्या वादावर उत्तर देईल अशी तिच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. (All Photo Credit : Gautami Patil Instagram)