सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीची. या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?

सुपरस्टार गोविंदा या अभिनेत्रीच्या आकंठ प्रेमात बुडालेला होता. त्यातून त्याच्या प्रेमकहाणीची चर्चा होती. परंतु त्यांची ना प्रेमकहाणी पुर्ण झाली ना त्यांचे लग्न झाले.

या अभिनेत्रीसाठी चक्क गोविंदानं आपला ठरलेला साखरपुडाही मोडला होता. या अभिनेत्रीचं नावं आहे नीलम कोठरी.

बॉबी देओलपासून ते गोविंदापर्यंत अनेकांशी नीलनची नावं ही जोडलेली होती. तेव्हा गोविंदा यांनी मोडलेला त्यांचा विवाहही पुर्ण होऊ शकला नाही. सोबतच धर्मेंद्र यांनीही तिला आपली सून करून घेतले नाही.

नीलम फारशी बॉलिवूडमध्ये सक्रीय नाही. परंतु सध्या ती ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे.

ती ज्वेलरी डिझायनिंगचं कामं करते आणि सोबतच ती बिझनेस वुमनही आहे.

नीलमने 2000 मध्ये ऋषी सेठियाशी लग्न केलेलं परंतु त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. 2011 मध्ये तिने टीव्ही अभिनेता समीर सोनीशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी देखील आहे.

VIEW ALL

Read Next Story