राकेश रोशन यांनी कधीच अमिताभबरोबर केलं नाही काम कारण...

तिकीटबारीवर दमदार कामगिरी

राकेश रोशन हे त्यांच्या अभिनयाबरोबरच दिग्दर्शनासाठीही ओळखले जातात. त्यांच्या अनेक चित्रपटांनी तिकीटबारीवर दमदार कामगिरी केली आहे.

आज वाढदिवस

आज राकेश रोशन यांचा वाढदिवस असून चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

अनेकांबरोबर केलं काम पण...

राकेश यांनी अनेक कलाकारांबरोबर काम केलं आहे पण त्यांनी कधी अमिताभ यांच्याबरोबर काम केलेलं नाही. यामागे एक खास कारण आहे.

मनोरंजन सृष्टीत पाऊल

1970 च्या दशकामध्ये राकेश रोशन यांनी 'घर-घर की कहानी' चित्रपटातून मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलं. नंतर त्यांनी अनेक भूमिका साकारल्या.

आता दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात

सध्या राकेश रोशन हे यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओखले जातात. ते आता अभिनयापासून दूर आहेत.

अमिताभ यांच्याबरोबर कधीच केलं नाही काम

मात्र राकेश रोशन यांनी आपल्या 53 वर्षांच्या करकिर्दीमध्ये अमिताभबरोबर कधीच काम केलं नाही.

मी तो चित्रपट अमिताभ यांच्यासाठी तयार केलेला

एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात राकेश रोशन यांनी माहिती दिली होती. 'किंग अंकल' हा चित्रपट अमिताभ यांना डोक्यात ठेऊन मी तयार केला होता, असं सांगितलं.

आधी हो बोलले अन्...

अमिताभ यांनाही 'किंग अंकल'ची संकल्पना आवडली. मात्र प्रत्यक्षात काम करण्याची वेळी आली असता त्यांनी खासगी कारणं सांगून नकार दिला. त्यानंतर राकेश रोशन यांनी जॅकी श्रॉफबरोबर हा चित्रपट केला.

पुन्हा अमिताभ यांना कधीच दिली नाही ऑफर

यानंतर राकेश रोशन यांनी कधीच अमिताभ यांना चित्रपट ऑफर केला नाही. मात्र हे दोघेही एकमेकांचा सन्मान करतात.

VIEW ALL

Read Next Story